मुंबई - डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन २ नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी मध्य रेल्वेने शनिवार व रविवारच्या सुट्टीत पनवेल येथे मोठा ब्लॉक चालवला. त्यानंतर पनवेल ईएमयू (EMU) स्टेबलिंग साईडिंग येथे पोस्ट कमिशनिंग काम म्हणून, ५ ऑक्टोबरपासून मध्यरात्री ब्लॉक चालवण्यात आला होता आणि उर्वरित साइडिंग सुरू करण्यासाठी, ५ व ६ ऑक्टोबर (गुरु/शुक्र) ते ८ व ९ ऑक्टोबर २०२३ (रवि/सोम) पर्यंत पनवेल येथे मध्यरात्री ०१.१५ ते ०४.४५ वाजेपर्यंत मध्यरात्री ब्लॉक चालवला जाईल. या ब्लॉकची माहिती घेवून प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्लॉक कालावधीत दि. ०५/०६.१०.२०२३ (गुरुवार/शुक्रवार) ते ०८/०९.१०.२०२३ (रविवार) मध्यरात्री ०१.१५ ते ४.४५ वाजेपर्यंत या तीन दिवसांसाठी बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा रद्द राहतील.
• दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) दरम्यान डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१४ वाजता सुटेल आणि ००.३४ वाजता पनवेलला पोहोचेल.
• दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून २३.३२ वाजता सुटेल आणि ००.२४ वाजता पनवेलला पोहोचेल.
• अप हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल.
• दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत अप ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल २२.१५ वाजता पनवेलहून सुटेल आणि २३.०७ वाजता ठाण्याला पोहोचेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार असेल.
• दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक पुर्ण झाल्यानंतर पहिली लोकल ट्रेन ०६.२० वाजता ठाण्याहून सुटेल आणि ०७.१२ वाजता पनवेलला पोहोचेल.
• दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन ०५.१७ वाजता सुटेल आणि ०६.३६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला पोहोचेल.
• ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने दि. ५/६.१०.२०२३ (गुरु/शुक्र) ते ८/९.१०.२०२३ (रवि/सोम) पर्यंत पहिली लोकल ट्रेन ०५.४४ वाजता पनवेलहून सुटेल आणि ०६.३८ वाजता ठाण्याला पोहोचेल.
No comments:
Post a Comment