एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 October 2023

एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण


मुंबई - मुख्यमंत्री बदलांच्या बातम्यांना उधाण आले होते. परंतु एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री राहणार असून मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अफवांना पुन्हा एकदा पूर्णविराम दिला आहे. (Eknath Shinde will be the Chief Minister of Maharashtra)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या “इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह” मध्ये बोलताना अनेक विषयावर आपले मत परखडपणे व्यक्त केले. महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील अशी प्रतिक्रिया दिली. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्त्वात लढवू. राज्यात सीएम बदलणार नाहीत असे स्पष्ट मत व्यक्त करत अफवा पसरवणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक उत्तर दिले. 

मुलखातीत बोलताना ते म्हणाले की, राजकीय वर्तुळात सध्या मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असली तरी त्याबाबत सध्या कोणताही निर्णय होणार नाही. कारण राजकारणात सहा महिन्यात असा कोणताही सहज बदल होत नाही. त्यामुळे आगामी काळातील कोणत्याही निवडणुका असल्या तरी त्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने पक्षाची ताकद वाढली असून एकनाथ शिंदेची आमची नैसर्गिक युती आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेवर जनतेने दाखवलेला विश्वास आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागला असल्याचे मत मुलाखतीत व्यक्त केले. 

राज्याच्या राजकारणावर बोलत असताना त्यांनी ठाकरे गटा सोबतच्या युती बद्दल देखील आपले मत व्यक्त केले ते म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत सरकार स्थापन करताना त्यांनी फक्त ४ जागांसाठी आमच्याबरोबरची नैसर्गिक युती तोडली. उध्दव ठाकरे यांनी विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad