जेरुसलेम - इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत २२ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.
कमिटी टू प्रोटेक्ट (CPJ) जर्नालिस्ट्सच्या म्हणण्यानुसार मृतांमध्ये १८ पॅलेस्टिनी, ३ इस्रायली आणि १ लेबनीज पत्रकार आहे. सीपीजेच्या म्हणण्यानुसार, यापैकी १५ मृत्यू इस्रायलच्या हवाई हल्ल्यात झाले आहेत आणि २ पत्रकार हमासच्या हल्ल्यात मारले गेले आहेत.
सीपीजेच्या म्हणण्यानुसार, या संघर्षात आठ पत्रकार जखमी झाले आहेत, तीन एकतर बेपत्ता आहेत किंवा त्यांना बंदी बनवण्यात आले आहे. सीपीजेच्या प्रवक्त्याने सांगितले की, सीपीजेने यावर भर दिला की, पत्रकार देखील संकटाच्या वेळी कठीण काम करणारे नागरिक आहेत आणि युद्धातील पक्षांनी त्यांना लक्ष्य करू नये. सीपीजेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गाझामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना धोका जास्त आहे कारण तेथे इस्राईल ग्राउंड मोहिम राबवण्याची शक्यता आहे.
इस्राईल गाझावर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. हमासच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत चार हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. दक्षिण इस्राईलमध्ये हमासच्या हल्ल्यात १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यादरम्यान बंदी बनवलेल्या २ अमेरिकी महिलांना हमासने मुक्त केले आहे. हल्ल्यानंतर ओलिसांची ही पहिलीच सुटका आहे. मानवतावादी कारणांसाठी आई आणि मुलीची सुटका करण्यात आल्याचे हमासने म्हटले आहे.
रफाह सीमा उघडण्यात आली -
गाझा आणि इजिप्तला जोडणारी रफाह सीमा क्रॉसिंग शनिवारी मदत वस्तूंच्या वाहतुकीसाठी उघडण्यात आली आहे. सध्या फक्त २० ट्रक गाझामध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर जागतिक अन्न कार्यक्रम आणि इतर मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे की, गाझामधील परिस्थितीला तोंड देण्यासाठी दररोज किमान १०० ट्रक मदत सामग्रीची आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment