समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, १२ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2023

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, १२ जणांचा मृत्यू


छ. संभाजी नगर - समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू आणि २३ प्रवासी जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका परिसरात ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक मध्ये हा अपघात झाला. अपघातातील मृतांबाबत शोक संवेदना व्यक्त करून केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ७ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याच्याजवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला. ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झालाय. आपघातातील जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत. नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संभाजीनगरच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघाताबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची तसेच जखमींवर शासकीय खर्चातून उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

मृतांची नावे -
१) तनुश्री लखन सोळसे (वय ५ वर्षे, राहणार समतानगर नाशिक)
२) संगीता विलास अस्वले (वय ४० वर्षे, राहणार वनसगाव, तालुका निफाड जिल्हा नाशिक)
३) पंजाबी रमेश जगताप (वय ३८ वर्षे, राहणार राजूनगर नाशिक)
४) रतन जमदाडे (वय ४५ वर्ष, राहणार संत कबीरनगर वैजापूर)
५) काजल लखन सोळसे (वय ३२ वर्ष, राहणार समता नगर नाशिक)
६) रजनी गौतम तपासे (वय ३२ वर्षे, राहणार गवळणी नाशिक)
७) हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७० वर्ष, राहणार उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक)
८) झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५८ वर्ष, राहणार राजूनगर नाशिक)
९) अमोल झुंबर गांगुर्डे (वय १८ वर्षे, राहणार राजूनगर नाशिक)
१०) सारिका झुंबर गांगुर्डे (वय ४० वर्ष, राहणार राजूनगर नाशिक)
११) मिलिंद हिरामण पगारे (वय ५० वर्ष, राहणार कोकणगाव ओझर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक)
१२) दीपक प्रभाकर केकाने (वय ४७ वर्ष, राहणार बसवंत पिंपळगाव नाशिक)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad