मुंबई - लोकशाही चॅनलने (Lokshahi) काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते. मात्र याबाबत एकतर्फी निर्णय घेत लोकशाही चॅनल 72 तास बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. हा लोकशाहीचा अपमान असून याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. हे चॅनल त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टने (Journalist) केंद्र सरकारकडे (Central Government) केली आहे. विधान परीषेदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोमया यांच्या व्हिडिओ प्रकरणी तपास सुरू असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही न्यूज ला नोटीस बजावत 72 तासासाठी चॅनल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रसारमाध्यमांची गळचेपी असून माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सरकार करत असल्याचा महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचा आरोप आहे. महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या दडपशाहीचा निषेध करत असून लोकशाही चॅनल त्वरित सुरू करण्याचे प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी अध्यक्ष श्रीनिवास गुंडारी आणि सरचिटणीस प्रमोद खरात यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, लोकशाही मराठीला लोकशाहीला मार्गाने न्याय मिळवून दिला पाहीजे. बातमी चुकीची असेल तर त्याचे खंडण केले पाहीजे पण लोकशाही मराठी चॅनेलवर अशी कारवाई कशी करु शकता. लोकशाही मराठीला नक्की न्याय्य मिळेल अशी प्रतिक्रिया विधान परीषेदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली.
दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषदेत कोणत्याही चॅनलवर बंदी घालण चुकीचं. अनेक चॅनल आहेत. यांचा अर्थ या चॅनलने फक्त सरकारची तळी उचलली पाहिजे. सरकारचे गोडवे गायले पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता निर्माण करत असेल तर जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. लोकशाहीवर बंदी घालणं ही हूकुमशाही असल्याचं ते म्हणाले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी लोकशाही न्यूजवरील या कारवाईचा ट्विटरवरुन एका शब्दात निषेध केला आहे. आणीबाणी, लिहीत संजय राऊतांनी टीका केली आहे. तर, अंबादास दानवेंनीही प्रतिक्रिया देत सरकारने याची चौकशी केली की नाही केली हे खोटं आहे का खरं आहे? याबद्दल स्पष्टता नसताना सरकारने लोकशाही चॅनलवर कारवाई करणे ही भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारची दादागिरी आहे. माध्यमांवरील ही दादागिरी मला असं वाटतं लोकशाहीमध्ये हे खूप मोठे घातक आहे. यावर जनता आवाज उठवेल, अशी टीका त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment