विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला दिलासा ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2023

विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला दिलासा !


मुंबई - शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील यावेळी युक्तिवाद करत आहेत. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले जात आहे. शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी सुनावणीच्यावेळी जे झालं ते माध्यमांसमोर सांगितलं. आम्हाला सुनील प्रभू यांच्याकडील कागदपत्रे मिळाली नाहीत. तसेच आमच्याकडचे कागदपत्रही त्यांना मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला दोन आठवड्याची मुदत द्यावी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. शिंदे गटाची ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज सुनावणी सुरू झाली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून अनिल सिंग हे तर ठाकरे गटाकडून वकील असीम सरोदे हे बाजू मांडत आहेत. यावेळी दोन्ही गटाने आपलाच पक्ष कसा कायदेशीर असल्याचं विधानसभा अध्यक्षांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.दरम्यान शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी असे सांगितले कि ,आम्हाला सुनील प्रभू यांच्याकडील कागदपत्रे मिळाली नाहीत. तसेच आमच्याकडचे कागदपत्रही त्यांना मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला दोन आठवड्याची मुदत द्यावी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे . गणपती उत्सव असल्याने अनेक आमदार गावाकडे जात असतात. त्यामुळे दोन आठवड्यांची ही मुदत असावी अशी मागणीही आम्ही विधानसभा अध्यक्षांना केली होती, असं अनिल सिंग यांनी सांगितलं.

दरम्यान, शिंदे गटाची ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला दोन आठवड्याचा वेळ दिला आहे. आजपासून दोन आठवड्यात रिप्लाय फाईल करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. तसेच दोन आठवड्यात फाईल एक्सचेंज करण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad