रत्नागिरी - गणेश भक्तांना गावाकडे जाण्याचे वेध लागलेले आहेत. मुंबईतून हजारो कुटुंब आपल्या गावी येणार असून त्यांच्यासाठी कोकण रेल्वे मार्गावरून ३१२ गणपती स्पेशल रेल्वे (Ganpati special Train) गाड्या १३ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहेत. त्यामध्ये मध्य रेल्वे (Central Railway) आणि कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) २५७ तर पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) ५५ गणपती स्पेशल गाड्यांचा समावेश आहे.
मध्यच्या २५७, पश्चिमच्या ५५ अशा ३१२ फेऱ्या -
गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या गणपती स्पेशल १३ सप्टेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. यातील पहिला मान ०११७१/ ०११७२ क्रमांकाच्या सीएसएमटी मुंबई-सावंतवाडी गणपती स्पेशलला मिळणार आहे. १३ सप्टेंबर ते २. ऑक्टोबर ता कालावधीत स्पेशलच्या ४० फेऱ्या धावणार आहेत. ही स्पेशल सीएसएमटी मुंबई येथून १२ सप्टेंबर रोजी रात्री १२.२० वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी २.२० वा. सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात दुपारी ३.१० वा. सावंतवाडी येथू सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता सीएसएमटी येथे पोहचेल.
No comments:
Post a Comment