नवी दिल्ली - मणिपूरचे (Manipur) मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सोमवारी (४ सप्टेंबर) सांगितले की, मणिपूर सरकारने एडिटर गिल्ड ऑफ इंडियाचे (Editors Gild of India) अध्यक्ष आणि तीन सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सिंह यांनी त्यांच्यावर राज्यातील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. एडिटर्स गिल्डने अलीकडेच दावा केला होता की, मणिपूरमधील हिंसाचारावर प्रसारमाध्यमांचे अहवाल एकतर्फी आहेत.
मुख्यमंत्री सिंग म्हणाले की, राज्य सरकारने एडिटर गिल्डच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. जे मणिपूमधील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यात एडिटर गिल्डच्या अध्यक्षा सीमा मुस्तफा आणि तीन सदस्य, सीमा गुहा, भारत भूषण आणि संजय कपूर यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षाचे मीडिया रिपोर्ट्स पाहण्यासाठी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाची टीम मणिपूरला गेली होती. त्यात तीन सदस्यांचा समावेश होता.
तणाव वाढू शकतो -
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग म्हणाले की, एडिटर गिल्डचे सदस्य राज्यात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे तणाव वाढू शकतो. मुख्यमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की, कोणत्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी त्यांनी ‘केवळ काही विभागांच्या’ नव्हे तर ‘सर्व समुदायांच्या’ प्रतिनिधींना भेटायला हवे होते.
No comments:
Post a Comment