नवी दिल्ली - 2 हजाराच्या नोटा आज परत करण्याचा आजचा शेवट दिवसा होता. उद्यापासून या नोटा चलनातून बाद होणार होत्या. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने दोन हजार रुपयांच्या नोट बदलण्याची मुदत वाढवली आहे. आरबीआयने 7 ऑक्टोबरपर्यंत बँकेत दोन हजार रुपयांची नोट जमा करता येणार आहे. यासंदर्भात आरबीआयने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. यामुळे आता नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.
यापूर्वी दोन हजार रुपयांची नोट बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याच्या सूचना आरबीआयने दिल्या होत्या. पण आता आरबीआयकडून नोट बदलून घेण्यासाठी आठवड्याभराची वेळ दिली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर 2023पर्यंत 96 2000 नोटा बँक जमा झाल्या आहेत. 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. आतापर्यंत 3.42 लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआकडे परत आल्या आहेत.
No comments:
Post a Comment