वेळ पडली तर पक्षासाठी सासऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढणार - रक्षा खडसे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2023

वेळ पडली तर पक्षासाठी सासऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढणार - रक्षा खडसे


मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर लोकसभा (Loksabha) मतदारसंघाबाबत मोठा दावा केला आहे. देशभरात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण रावेर लोकसभेची जागा निवडू, असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या जागेवर सध्या एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) या खासदार आहेत. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, वेळ पडली तर आपण आपले सासरे एकनाथ खडसे यांच्यासमोर निवडणूक लढणार. निवडणुकीत कुठेही कमी पडणार नाही, असं म्हणत रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या , रावेर लोकसभेचा इतिहास पाहिला तर सातत्याने या ठिकाणी भाजपचाच विजय होत आलाय. भविष्यातही ही जागा भाजपच जिंकणार आहे, असं म्हणत रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभेच्या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. रावेर लोकसभेच्या जागेसाठी पक्षाने मला संधी दिली तर मी संधीचं सोनं करेनच . रावेर लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीची आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच निवडून येईल. राज्यातील जनता संभ्रमात आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी गेले. त्यामुळे मी देखील राष्ट्रवादीत जाईल, अशी चर्चा महाराष्ट्रात चर्चा आहे. मात्र, मी राष्ट्रवादीत जाणार नाही. मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करते आणि मी भारतीय जनता पार्टीची शेवटपर्यंत राहीन. पक्षाने संधी दिली तर मी याच ठिकाणावरून निवडणूक लढणार. मी इतर पक्षात जाणार नाही”, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

दरम्यान रक्षा खडसे या सध्या भाजपात आहेत. तर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात रावेरमध्ये दोघांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर राजकीय रणांगणात सख्खे सासरे आणि सून आमनेसामने येऊ शकतात. दुसरीकडे रक्षा खडसे या रावेर लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तसेच आपण या निवडणुकीत पुन्हा एकदा जिंकूनच येऊ, असा दावा त्यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad