पुणे - राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. आता या दोन्ही गटांमधला संघर्ष सध्या निवडणूक आयोगात सुरू आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. निडवणूक आयोग जो निर्णय देईल तो मला तरी मान्य असेल असं अजितदादा पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे प्रमुख होऊन 14 महिने झाले. प्रत्येक यंत्रणा त्यांची जबाबदारी पार पाडण्याचं काम करत असते, या बातम्यामध्ये काही तथ्य नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. मी काय सांगितलं या बातम्या काही सत्य नाहीत. जोपर्यंत कुठला निकाल येत नाही तोपर्यंत हे असं झालं तर तसं झालं तर काय होईल हे असले मी विचार पण करत नाही. मी फक्त विकासाचा विचार करतो. इलेक्शन कमिशन अंतिम निर्णय देते, इलेक्शन कमिशनसमोर दोन्ही गट आपली बाजू मांडतील. बाजू मांडल्यानंतर जो अंतिम निर्णय येईल तो मी तरी मान्य करणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान राज्यातील सत्तासंघर्षांनंतर पहिली निवडणूक ही लोकसभेची होणार आहे. या लोकसभेला अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर अजित पवार म्हणाले, मी लोकसभेचा विचार केलेला नाही. इतक्या लवकर त्यावरच चर्चा करून काही फायदा नाही. मात्र पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल असे अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment