मुंबई / माणगाव - मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ एसटी बस आणि ट्रकचा आज रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १ जण ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. या अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
एसटी बसनं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. माणगावजवळच्या रेपोली येथे हा अपघात झाला आहे. यात एक जण ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. त्यातील ९ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी कोकणात निघाले होते. ही बस मुंबईहून राजापूरकडे निघाली होती. ही बस माणगावजवळ आली असता तिचा भीषण अपघात झाला. अपघात घडल्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.
No comments:
Post a Comment