मुंबई - उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरे तलाव येथे सर्व प्रकारच्या गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे. तथापि, नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गणेश मूर्ती विसर्जनासाठी आरे तलाव येथे २ कृत्रिम तलावांची तर परिसरात ६ फिरत्या तलावांची उभारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
उपायुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार ‘पी दक्षिण’ विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आरे तलाव येथे सर्व प्रकारच्या गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंदी घातली आहे. तथापि, नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागाने आरे तलाव येथे २ कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. तसेच, पश्चिम द्रुतगती महामार्गालगत आरे रोड नाक्यावर ४ फिरते तलाव, पिकनिक स्पॉट जवळ २ फिरते तलाव यांची उभारणी केली आहे. गणेश मंडळांना या ठिकाणी ४ फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करता येईल. नागरिकांनी या कृत्रिम तलाव, फिरते तलाव या ठिकाणीच गणेश मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहनही राजेश अक्रे यांनी केले आहे.Post Top Ad
26 September 2023
गणेश मूर्ती विसर्जनासाठी आरे येथे २ कृत्रिम तलाव
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment