मध्य आणि हार्बर रेल्वेवर २० ऑगस्टला मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2023

मध्य आणि हार्बर रेल्वेवर २० ऑगस्टला मेगाब्लॉक


मुंबई - रविवार दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गावर उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक (mega block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या  माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर तर हार्बर रेल्वेच्या कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकची नोंद घेवून प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
 
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक - 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन  त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व  नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक -
कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी, नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad