पत्रकारांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करणार - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2023

demo-image

पत्रकारांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करणार

images%20(14)

मुंबई - (जेपीएन न्यूज) पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई याच्या निषेधार्ह राज्यातील पत्रकारांच्या अकरा प्रमुख संघटनांशी जोडले गेलेले सर्व पत्रकार उद्या प्रत्येक शहरात निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करतील. मुंबईत दुपारी बारा वाजता हुतात्मा चौकात हे आंदोलन होईल अशी माहिती एस. एम. देशमुख यांनी दिली आहे. (Attack on Journalist)

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करतात. 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे  पत्रकारांवर हल्ले झाले, त्यांना शिविगाळ केली गेली किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यानंतरही केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेला. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे. उद्या राज्यव्यापी आंदोलनाद्वारे याचा निषेध करण्यात येणार आहे.

पाचोऱ्याची घटना घडल्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्हीजेए, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांबद्दल चिंता व्यक्त केली होती. पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली होती. तत्पूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत 17 ऑगस्ट रोजी  पत्रकार संरक्षण कायदयाची राज्यभर होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार उद्याचे आंदोलन होत असून राज्यातील पत्रकारांनी संघटनी संघटनात्मक भेद न बाळगता उद्याच्या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचं आवाहन वरील अकरा संघटनांनी केले आहे.

तालुका आणि जिल्हास्तरावर कलेक्टर ऑफिस किंवा तहसिल कार्यालयासमोर किंवा शहरातील मध्यवर्ती चौकात हे आंदोलन करावे असे आवाहन संयुक्त कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे. मुंबईत हुतात्मा चौकात दुपारी 12 वाजता हे आंदोलन होईल. हुतात्मा चौकातील या आंदोलनानंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांबद्दल त्यांना माहिती देतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages