मुंबई - जुहू चौपाटीवर अनेकवेळा जेली फिशने हल्ला केला आहे. त्यात काही भक्त जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा जुहू चौपाटीवर जेली फिशने हल्ला केला आहे. त्यात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता जुहू चौपाटीवर सहा जणांना जेली फिशने चावा घेतला. या सहा जणांना महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींमध्ये तीन लहान मुले आहेत. ती ४ ते ६ वर्षांमधील आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनानी सांगितल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
जखमींची नावे -
1) मेहताब शेख (महिला - 20 वर्षे)2) दीक्षाद मेहता (पुरुष - 5 वर्षे)
3) मो. अहर मन्सुरी (पुरुष -4.5 वर्षे)
4) मेटविश शेख (महिला - 6 वर्षे)
5) मो. रजःउल्लाह (पुरुष - 22 वर्षे)
6) अर्थरिहा प्रमूह (महिला - 25 वर्षे)
No comments:
Post a Comment