नवी दिल्ली - 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि गृहरक्षक (होमगार्ड ) तसेच नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक आज जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
‘राष्ट्रपती शौर्य पदक’ उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2023 साठी 53 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.
शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल 03 जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा शौर्य पदक’ आणि एका जवानाला ‘अग्निशमन सेवा शौर्यपदक’ जाहीर झाले आहे.
उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 8 कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 41 कर्मचार्यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांचा समावेश आहे.
देशातील 48 कर्मचाऱ्यांना, स्वयंसेवकांना गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 05 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 43 कर्मचारी/ स्वयंसेवकांना जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘गृहरक्षक’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निसेवा पदक -
1. करीमखान फजलखान पठाण, फायर इंजिन चालक
2. कसाप्पा लक्ष्मण माने, फायरमन
3. नरसिंह बसप्पा पटेल, रुग्णवाहिका परिचर (आग)
4. रवींद्र नारायणराव अंबुलगेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी
5. दीपक कालीपाद घोष,उपमुख्य अग्निशमन अधिकारी
6. सुनील आनंदराव गायकवाड, उपअधिकारी
7. पराग शिवराम दळवी, लीडिंग फायरमन
8. तातू पांडुरंग परब, फायरमन
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक
1. तुषार चंद्रकांत वरंडे, सेंटर कमांडर (एचजी)
2. अय्युबखान अहमदखान पठाण,ऑफिसर कमांडिंग (HG)
3 राजेंद्र पांडुरंग शहाकर,होमगार्ड
4. सुधाकर पांडुरंग सुर्यवंशी, नागरी संरक्षणाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक (सीडी)
5. विजय जनार्दन झावरे, फायर रेस्क्यू लीडर (नागरी संरक्षण)
Post Top Ad
14 August 2023
महाराष्ट्रातील आठ अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’
Tags
# महाराष्ट्र
Share This
About JPN NEWS
महाराष्ट्र
Tags
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment