कामगार एकता नागरी सहकारी पतपेढीची 25 वी सर्वसाधारण सभा संपन्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 August 2023

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढीची 25 वी सर्वसाधारण सभा संपन्न


मुंबई - दादर पुर्व, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावस्कर हॉल येथे कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)ची रौप्य महोत्सवी अहवाल सभा नुकतीच कॉ. विठ्ठल घाग यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडली. कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी(मर्यादीत)चे वैशिष्ट्य म्हणजे 25 वर्षापुर्वी स्वान मिल कामगारांनी निवृत्ती नंतर मिळालेल्या पैशातून आपल्या गरजेपोटी ही पतपेढी सुरु केली.
   
25 वर्षानंतर या पतपेढीत छोटे दुकानदार, भाजी विक्रेते, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिलाही सभासद झाल्या आहेत. या  पतपेढीत 3860 सभासद आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या 7 कोटी 20 लाखाच्या ठेवी ठेवल्या आहेत. 2 कोटी 45 लाखाची पतपेढीने गुंतवणूक केली आहे. 61 लाखाचे भागभांडवल उभे केले आहे. 5 कोटी 70 लाखाचे कर्जवाटप आत्तापर्यंत केले आहे. अशा पद्धतीने 13 कोटीचा समिश्र व्यवहार या 25 व्या वर्षी पतपेढीने केला आहे.
  
ही पतपेढी गिरणी कामगारांची पतपेढी म्हणून ओळखली जाते. गिरणी कामगारांना घरासाठी 3 कोटी 50 लाखाचे कर्ज वाटप सुध्दा केले आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या सभेत सभासदांचे गुणवंत विद्यार्थी,  ठेवीदार, नियमित कर्ज फेडनारे कर्जदार. ज्यांनी या पतपेढीला मदत केली असे सर्व सन्माननिय सभासद. तसेच रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अंधशाळेतील मुलांचा व अनाथ मुलांचा संचालक मंडळाच्या हस्ते सन्मान करुन त्यांच्या शाळेला आर्थिक मदत ही करण्यात आली. यावेळी कामगार क्षेत्रातील नेते कॉ. ऍड. राजेंद्र कोरडे, कॉ. मनोज यादव, कॉ. अशोक पवार, गणेश घाग हे मान्यवर तसेच सहकार क्षेत्रातील दिनेश नाईक हे मान्यवर उपस्थित होते.
  
यावेळी पतपेढीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना या पतपेढीचे खरे मालक सर्व सभासद आहेत, तेव्हा तुम्ही भागभांडवल ठेवी वाढावी चांगले कर्जदार आणा. म्हणजे ही पतपेढी आपण आणखी मोठी करु. गिरणी कामगारांनी लढून मिळविलेले घर व ही पतपेढी वर्षानुवर्षे या मुंबई शहरात गिरणी कामगारांच्या लढ्याची ओळख जिवंत ठेवेल असे सांगितले.
  
उपस्थित सर्व सभासदांना भेटवस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक अध्यक्ष कॉ. विठ्ठल घाग,  उपाध्यक्ष प्रवीण घाग,  सेक्रेटरी शान्तारांम घुग, तज्ञ संचालक विलास घाग, प्रकाश गुणदेकर, सुधाकर गिरप, विनायक परब, मोहन कदम, यशवंत पाटेकर व खजिनदार उदय नेरुरकर हे संचालक उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानुन राष्ट्रगिताने सभा संपविण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad