आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड येथील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. बेस्ट कंत्राटी चालकांनी केलेल्या काम बंद आंदोलनामुळे घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड येथील बस सेवेवर परिणाम झाला. बस न आल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना तसेच शाळेत, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षा टॅक्सी आदी खासगी वाहनांनी नियोजित ठिकाणी पोहचावे लागले.
कामगारांच्या नेमक्या मागण्या काय -
• बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करा
• बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत सुरु करा, प्रत्येक बस मार्गावर बसगाड्यांची संख्या वाढवून बसफेऱ्या वाढवा.
• नादुरुस्त बसगाड्या दुरुस्ती केल्याशिवाय मार्गस्थ करणे बंद करा.
• मुंबईसाठी बेस्टचा स्वमालकीचा ताफा दुप्पट म्हणजेच किमान ६,००० बसेसचा करा.
No comments:
Post a Comment