मुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप केला. मागील आठ दिवसांपासून हा संप सुरू होता. काल सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान बहुसंख्य मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यामुळे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. (Best strike call off)
मूळ वेतनात वाढ करण्याबाबत कॉन्ट्रॅक्टर आणि आयुक्त यांची बैठक घेण्यात येईल. या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात भरघोस वाढ करण्यात येईल. वार्षिक रजा या भर पगारी करण्यात याव्यात, कर्मचाऱ्यांनी वार्षिक बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वेतनवाढ वाढ मिळावी. तसेच कामगारांना कामावर येण्यासाठी मोफत पास देण्याची सुविधा देण्यात येईल. अपघात झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास दूर करण्याबाबत आणि मागील आठ दिवस आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. कंत्राटी कामगारांमध्ये रिटायर्ड कर्मचाऱ्यांएवजी नवीन तरुणांना नोकरीत अधिक संधी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सात दिवस चालले. शहरातील सर्वच बस डेपोमधील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने ते तीव्र झाले होते. त्यामुळे बस स्थानक, आगारांमध्ये प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाला विविध आगारांमधील कंत्राटी कामगारांचा पाठिंबा मिळू लागल्याने या आंदोलनाची तीव्रता वाढली होती. मागील आठ दिवसांपासून बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने मुंबईकरांचे हाल होत होते. मात्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने अखेर संप मिटला असून यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment