सप्तश्रृंगी घाटात एसटी बसच्या अपघातात 18 प्रवाशी जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2023

सप्तश्रृंगी घाटात एसटी बसच्या अपघातात 18 प्रवाशी जखमी


नाशिक - सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा अपघात झाला असून या अपघातात 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांचेवर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. 

अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोची मुक्कामी बस असून त्यात 18 प्रवासी प्रवास करीत होते. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून पालकमंत्री भुसे हे स्वतः आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad