२ लाखांची लाच मागणाऱ्या पत्रकाराला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 July 2023

२ लाखांची लाच मागणाऱ्या पत्रकाराला अटक


धाराशिव - पाझर तलाव व साठवण तलावाकरिता संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला प्रांत कार्यालयाकडून मिळवून देतो असे सांगून २ लाखाची लाच घेताना धाराशिव येथील एका दैनिकाच्या संपादकाला व एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगोहाथ पकडले. ही कारवाई १५ जुलै रोजी धाराशिव शहरात करण्यात आली. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A journalist who demanded a bribe of 2 lakhs was arrested)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेली शेतजमीन शासनाने पाझर तलाव व साठवण तलावाकरिता संपादीत केलेली होती. सदर संपादित जमिनीबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकचा मोबदला प्रांत कार्यालय, धाराशिव येथील अधिकारी व कर्मचारी यांना सांगून मिळवून देतो. तुमच्या संपादित जमीनीचा मोबदला २६ लाख ५६ हजार १७ रूपये व ४ लाख ३१ हजार ७९८ रूपये असे दोन्ही चेक काढुन देण्याकरिता २ लाख रूपयांची मागणी दैनिक मराठवाडा योद्धाचे संपादक बाबासाहेब हरिशचंद्र अंधारे व खाजगी व्यक्ती अनिरूद्ध अंबऋषी कावळे (रा. केकस्थळवाडी ता. धाराशिव) या दोघांनी केली होती. या दोघांना २ लाखाची लाच घेताना पोलीसांनी १५ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी एसीबीचे पोलीस निरिक्षक विकास राठोड यांनी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या पथकात पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे, विशाल डोके, सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad