मुंबई - राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येत असून त्याअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगरसाठी सहा फिरत्या बालस्नेही पथकाचे लोकार्पण आज मंत्रालय प्रवेशद्वार येथे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे यावेळी उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, या प्रकल्पात बालस्नेही व्हॅन, काळजीवाहू, समुपदेशक आणि शिक्षकांसह सुसज्ज आहेत. रस्त्यावर सापडलेल्या मुलांची मुक्तता करून त्यांना जवळच्या स्वयंसेवी संस्था किंवा सरकारी शाळेत पोहोचवते. या केंद्रांवर, मुलांना शिक्षण, पुनर्वसन उपक्रम, पौष्टिक आहार आणि मानसिक-सामाजिक समर्थन मिळण्यास मदत होईल. फिरती पथक प्रकल्पाचा विस्तार करून, रस्त्यावरील मुलांची काळजी आणि संरक्षण वाढवण्याचे, त्यांना सुरक्षित आणि पालनपोषणासाठी आवश्यक ती साधने मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना देखील एक सुरक्षित वातावरण मिळून या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा राज्य शासनाचा महत्वपूर्ण प्रयत्न आहे.
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची काळजी घेवून त्यांचे सुरक्षित वातावरणात संगोपन करून शिक्षण देवून या मुलांच्या पुनर्वसनासाठी महिला व बालविकास विभागामार्फत या प्रकल्पासाठी ७२ लाख रूपयांची सहा महिन्यांसाठी तरतूद केली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांसाठी हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यांतर्गतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर साठी सहा फिरते बालस्नेही पथक नेमण्यात आले आहेत.
प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाला मिळाले यश -
फिरते बालस्नेही पथक या सुरुवातीच्या टप्प्यात यश मिळाले आहे. प्रत्येक आठवड्यात दोन हॉटस्पॉट क्षेत्रांचा समावेश करून ठाणे आणि नाशिकने हा प्रकल्प राबविला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच त्याचे उद्घाटन होईल. ठाणे जिल्ह्यातील फिरती पथके मॉडेलचा प्रभाव चांगल्या प्रकारे पडला आहे. ज्याने 40 हून अधिक मुलांना शैक्षणिक आणि संरक्षण आधारित सहाय्य दिले आहे. भिवंडीसारख्या इतर भागात ही फिरते बालस्नेही पथक सुरू करावे अशी मागणी वाढत आहे. या प्रकल्पाने रस्त्यावर राहणाऱ्या पालकांमध्ये वर्तणुकीतील बदल घडवून आणले आहेत आणि मनो-सामाजिक समर्थन आणि पुनर्वसन सेवांमध्ये प्रवेशाद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास सुलभ केला आहे. तज्ञांद्वारे व्यवस्थापित केलेल्या सतत ओळख आणि पुनर्वसन प्रक्रियेमुळे गरजू मुलांची ओळख वाढली आहे.

No comments:
Post a Comment