उकिरडा उचल म्हणत दलित कुटुंबाला मारहाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 July 2023

उकिरडा उचल म्हणत दलित कुटुंबाला मारहाण


अहमदनगर - तू टाकलेला उकिरडा आणि सरपण उचलून घे म्हणत दलित कुटुंबाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सुळे पिंपळगाव येथे समोर आला आहे. दलित कुटुंबीयांवर हल्ला केल्या प्रकरणी गावातील ११ जणांविरोधात अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायदा (एट्रोसिटी) व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्याचा अधिक तपास शेवगावचे पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील हे करीत आहे.

आपण गावातील गावठाणात असणारी सरकारी शेतजमीन वडिलोपार्जित कसत असून, शेजारील गटनंबर असलेल्या व्यक्तींनी मला तू टाकलेला उकिरडा व सरपण उचलून घे असे म्हणाले, या कारणावरून झालेल्या वादातून मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांना जातीयवाचक शिवीगाळ करून मारहाण केली,असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी भास्कर रावसाहेब मासाळ, आजिनाथ रावसाहेब मासाळ, प्रकाश रावसाहेब मासाळ गंगाधर रावसाहेब मासाळ, गणेश अभिमान मासाळ, रमेश मोतीराम माने, प्रताप रोहिदास मासाळ, महेश अभिमान मासाळ, भाऊसाहेब मारुती मासाळ, संदीप किसन मासाळ, नानासाहेब देवराम माळी यांच्या विरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७१२/२३ भादवी कलम ३५४ (अ) १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तसेच बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कलमानुसार गून्हा दाखल केलाय. सर्व आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad