इर्शाळवाडी दुर्घटना - मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली जखमींची भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2023

इर्शाळवाडी दुर्घटना - मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली जखमींची भेट


मुंबई - खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. (Minister Aditi Tatkare visited the injured in the hospital)

रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल लाचके उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. इथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad