मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारी ६०० मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन मुलुंड पश्चिम येथे फुटली आहे. यामुळे उद्या बुधवारी १४ जून रोजी मुलुंड पश्चिम विभागाला पाणीपुरवठा होणार नाही अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुलुंड पश्चिम येथील अमर नगर येथे पाणीपुरवठा करणारी ६०० मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन आज (१३ जून) रोजी सायंकाळी ५.१८ वाजता फुटली आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम उद्या बुधवारी १४ जून रोजी सकाळी ११ वाजता हाती घेतले जाणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. यामुळे उद्या बुधवारी मुलुंडच्या या विभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याची नोंद नागरिकांनी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment