मुंबई - घाटकोपर राजावाडी येथे रविवारी एका बंगल्याचा काही भाग कोसळला होता. धिगाऱ्याखाली पाच लोक दबले होते. त्यापैकी तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर धिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी (२५ जून) सकाळी ९ च्या सुमारास राजावाडी येथील एका तीन मजली बंगल्याचा खालील भाग कोसळला. त्यात ५ जण अडकले होते. मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफ, पालिका आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेवून ३ जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.
दोन जणांचा मृत्यू -
बंगल्याखाली अडलेल्या २ जणांचा शोध सुरूच होता. रविवार आणि सोमवारच्या (२६ जून) मध्यरात्री १.२५ वाजता एका महिलेला तर आज सकाळी ९ वाजता एका पुरुषाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. या दोघांना राजावाडी रुग्णालयात पाठवले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अलका महादेव पालांडे व नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत.
No comments:
Post a Comment