पालघर - शिवसेनेच्या जाहिरातीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा होती. मात्र फेव्हिकॉल लावलेली आमची जोडी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलीच नाराजी नसल्याचे दाखवून दिले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात उपस्थित आहेत. दोघेही एकाच हेलिकॉप्टरने पालघर येथे कार्यक्रमाला गेले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. सर्वसामान्य लोक ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात आले आहेत, त्यांचे आभार मानतो, असे शिंदे म्हणाले. आताचे शासन बदलले आहे. सरकारी कार्यालयात आता खेटे मारायला लागत नाहीत. आपल्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असा आमचा उपक्रम आहे. मी आणि उपमुख्यमंत्री आधीच्या सरकारमध्ये देखील होतो. आता ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत सरकार पोहोचले आहे. आमचे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये फरक आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. डबल इंजिन सरकार येण्यापूर्वी सर्व कामांना ब्रेक लागले होते, आता सरकारने ४०० चांगले निर्णय घेतले, असे शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने फडणवीसांच्या काळातील अनेक योजना बंद केल्या. देवेंद्रजी पाच वर्षे मुख्यमंत्री होते. आता आपले सरकार आल्यानंतर योजना पुन्हा सुरू केल्या. देवेंद्रजींच्या अनुभवाचा फायदा राज्याला झाला. आमची युती सत्तेसाठी झाली नाही. एका वैचारिक भूमिकेतून ही युती झाली. मिठाचा खडा आम्ही बाजूला केला. फडणवीस आणि माझी दोस्ती १५ वर्षांपासून आहे. जिवाभावाची आमची मैत्री आहे. हे बॉण्डिंग तुटणार नाही. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment