मुंबई - केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्राप्त मार्गदर्शक सूचना व महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याकरिता https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अद्याप ज्या पथ विक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला नसल्यास त्यांनी ते व्यवसाय करीत असलेल्या सबंधित विभाग कार्यालयात वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांच्याशी संपर्क साधून, संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विभाग कार्यालयातून करण्यात येईल.
कोविड संसर्गामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला होता. तेव्हापासून त्यांच्या व्यवसायास खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ राबविण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत साधारणपणे ९० हजार पथविक्रेत्यांना बँकेमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. ही योजना डिसेंबर २०२४ पर्यंत लागू असून, अद्यापपर्यंत ज्या पथ विक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी तात्काळ संबंधित विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
अशी आहे योजना -
नागरी पथ विक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. तसेच या दहा हजार रुपयांची परतफेड केल्यास सदर पथविक्रेत्यास आणखी २० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. संबंधित कर्जदार पथविक्रेत्याने या २० हजार रुपयांची परतफेड केल्यास त्यास आणखी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल.
असा करा अर्ज -
संबंधित इच्छुक पथविक्रेत्याने https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तसेच त्याच्याकडे आधार कार्डशी जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्याने स्वत: व्यवसाय करणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेचा लाभ घेतल्यास “स्वनिधी से समृद्धीतक” या योजनेचा लाभ संपूर्ण कुटूंबास प्राप्त होणार आहे.
कोविड संसर्गामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला होता. तेव्हापासून त्यांच्या व्यवसायास खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ राबविण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत साधारणपणे ९० हजार पथविक्रेत्यांना बँकेमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. ही योजना डिसेंबर २०२४ पर्यंत लागू असून, अद्यापपर्यंत ज्या पथ विक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी तात्काळ संबंधित विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
अशी आहे योजना -
नागरी पथ विक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. तसेच या दहा हजार रुपयांची परतफेड केल्यास सदर पथविक्रेत्यास आणखी २० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. संबंधित कर्जदार पथविक्रेत्याने या २० हजार रुपयांची परतफेड केल्यास त्यास आणखी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल.
असा करा अर्ज -
संबंधित इच्छुक पथविक्रेत्याने https://pmsvanidhi.mohua.gov.
No comments:
Post a Comment