Mumbai News - इमारतीची लिफ्ट कोसळून १२ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2023

Mumbai News - इमारतीची लिफ्ट कोसळून १२ जखमी


मुंबई - लोअर परळ, सेनापती बापट मार्ग, कमला मिल कंपाऊंड मधील ट्रेड वर्ल्ड ही तळ अधिक १४ मजली इमारत असून या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन ११.४० वाजता लिफ्ट खाली कोसळली. या दुर्घटनेत १२ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्लोबल रुग्णालय व केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रियंका चव्हाण (२६), रतिक शिंदे (२६), अमित शिंदे (२५), मोहम्मद रशीद (२१), प्रियांका पाटील (२८), सुधीर शहारे ( २९), मयूर गोरे ( २८), तृप्ती कुबल ( ४६) या जखमींना ग्लोबल रुग्णालयात दाखल केले आहे. तर किरण चौकेकर ( ४८) या जखमीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad