ठाणे - भिवंडी शहरातील तहसील कार्यालयात फेरफार हरकत प्रकरणाच्या निर्णयाची प्रत देण्यासाठी मागितलेल्या रक्कमेपैकी ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नायब तहसीलदार महिलेवर सापळा रचून त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. सिंधू उमेश खाडे (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या नायब तहसीलदार महिलेचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने परिसरातील सरकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
भिवंडी तहसील कार्यालयात तक्रारदार वकिलांच्या अशिलाची फेरफार हरकत प्रकरणाबाबत दावा सुरु होता.या प्रकरणी दिलेल्या अंतिम निर्णयाची प्रत देण्यासाठी कार्यालयातील नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे यांनी दिड लाख रुपयांची मागणी केली. तेंव्हा तक्रारदार वकील यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.त्या रक्कमेपैकी ५० हजार रुपये गुरुवारी देण्याचे ठरले. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी भिवंडी नायब तहसीलदार कार्यालयात गुरुवारी दुपारी सापळा लावला. त्यानुसार नायब तहसीलदार सिंधू खाडे यांना ५० हजार रुपये स्विकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. या लाचप्रकरणी स्थानिक शांतीनगर पोलीस ठाणे येथे खाडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विविध कलमासह गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
No comments:
Post a Comment