रत्नागिरी / दापोली - रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर रविवारी (२५ जून) संध्याकाळी मॅक्झिमो (वडाप गाडी) आणि ट्रेलर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बाप-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये मॅक्झिमोचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे दापोली आणि हर्णे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने जंगलामध्ये पळ काढला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा
दापोली तालुक्यातील हर्णे मार्गावर आसूद जोशी बागेजवळ काल संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. बांधकाम साहित्य रिकामे करुन आलेला रिकामा ट्रेलर दापोलीकडे येत होता. यावेळी समोरुन मॅक्झिमो घेऊन हर्णेच्या दिशेने जात होते. यावेळी वडाप गाडीत १४ प्रवासी होते. दोन्ही गाड्या जोशी बागेजवळ अवघड वळणावर आल्या. यावेळी ट्रेलरने बाहेरुन वळण घेतले. यामुळे मॅक्झिमोला पुढे जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही.याचवेळी ट्रेलरने या गाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.
वडाप गाडीच्या चालकाचा मृत्यू
अपघातात मृत्यू झालेले सर्व दापोली तालुक्यातील होते. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना उपचारांसाठी सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार करुन काही जणांना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठवण्याची माहिती आहे. या अपघातात मॅक्झिमो गाडीचा चालक अनिल सारंग यांचा मृत्यू झाला.

५ लाखांची मदत -
दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्याचे तसेच निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment