
याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने केलेल्या अत्याचाराच्या संदर्भात कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी घाबरली होती.
पीडित मुलगी राहत असलेल्या सोसायटीमध्ये काम करणारा 45 वर्षीय सुरक्षा रक्षक गेल्या एक ते दीड वर्षांपासून पीडित मुलीला असभ्यरित्या स्पर्श करत होता. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी रविवारी पोलिसाकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल गेऊन तत्काळ गुन्हा दाखल केला.
No comments:
Post a Comment