मुंबई - लैंगिक छळाचे आरोप असलेल्या खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना अटक करून त्यांची खासदारकी लगोलग रद्द करण्यात यावी अशी मागणी माऊली बहुउद्देशिय महिला संस्थेच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश सरचिटणीस उषाताई चौधरी यांनी केली आहे. यासंदर्भात राज्यातील महिला संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
देशातील प्रथितयश कुस्तीपटू महिलांनी खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतर मंतर येथे मागील ४० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. खा सिंग यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू महिलांना यावेळी दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीचा चौधरी यांनी निषेध केला आहे. चौधरी यांनी महाराष्ट्रातील महीला शिष्टमंडळा समवेत नुकतीच जंतरमंतर येथील आंदोलनस्थळी कुस्तीपटू साक्षी मलिक यांची भेट घेवून त्याच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील महिलांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.
जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला ४० दिवस पूर्ण होवूनही केंद्र सरकार किवा उत्तर प्रदेश पोलिस प्रशासन खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू शकलेले नाही शेवटी दिल्ली न्यायालयाच्या आदेशानंतर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला, हा समस्त महिला वर्गाचा अवमान असून सत्तेच्या कैफात धुंद असलेल्या सिंग यांची अलीकडील बेफाम वक्तव्ये ही केंद्र आणि उत्तर प्रदेश भाजप सरकारच्या सुप्त पाठिंब्याची द्योतक तर नाही ना? असा सवाल चौधरी यांनी केला आहे.
देशातील महिला सुरक्षित तर देश सुरक्षित ही भावना जर केंद्र व उत्तर प्रदेश सरकारला जपायची असेल तर त्यांनी खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्वरीत त्यांच्या अटकेचे आदेश उत्तर प्रदेश सरकारला द्यावेत तसेच त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी चौधरी यांनी केली . यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व महिला संघटना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्रातील सर्व खेळाडू आणि जनतेनेदेखील अशी पत्रे पाठवून जंतर मंतर वरील आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment