मुंबई - मुंबईत शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. गेल्या २४ तासात मुंबई शहरापेक्षा उपनगरात पाऊस मोठ्याप्रमाणात पडला आहे. आज (२५ जून) मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो असा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
काल शनिवारी (२४ जून) दिवसभर पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवावे लागले. रेल्वे सेवा मात्र सुरळीत सुरू होती. पावसामुळे गेले काही महिने उन्हामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाकडे २४ जून सकाळी ८ ते २५ जून सकाळी ८ या २४ तासात कुलाबा येथे ८६ तर सांताक्रुझ येथे १७६.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महापालिकेकडे शहर विभागात १०४, पूर्व उपनगरात १२३ तर पश्चिम उपनगरात १३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान आज रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो असा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment