मुंबई - मुंबईत आज मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवावे लागले. रेल्वे सेवा मात्र सुरळीत सुरू होती. पावसामुळे गेले काही महिने उन्हामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील २४ तासात मुसळधार पाऊस पडू शकतो असा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत २३ जूनला उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या. आज २४ जून रोजी मध्यरात्रीनंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली. रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई शहरात ७१, पूर्व उपनगरात ७९, पश्चिम उपनगरात ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचे पाणी साचल्याने सायन किंग सर्कल, रोड नंबर २४, मिलन सबवे, दहिसर सबवे, मालाड सबवे येथे पाणी साचल्याने येथील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवून इतर मार्गाने वळविण्यात आली होती. मुंबईत आतापर्यंत सखल भागात पाणी साचत होते. यंदा मात्र उड्डाणपुलांवरही पाणी साचल्याने दिसून आले. यामुळे वाहन चालकांना मात्र त्रास सहन करावा लागला.
बस मार्ग वळवले -
सायन रोड नं.२४ येथे पावसाचे पाणी भरल्याने सायन सर्कल ते सायन स्टेशन सिग्नल दरम्यान नियोजित मार्ग बंद करुन व्हाया सायन रोड नं.३ A मार्गे बसमार्ग ७,२२,२५,३०२,३१२,३४१ च्या बसगाड्या वेळ १७.३० पासुन परावर्तित करण्यात आलेल्या होत्या. रात्री ९ वाजता या मार्गावरील बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
दहिसर सबवे येथे पाणी साचल्यामुळे बस मार्ग क्रमांक ए २०८ ,२०७,७०७,मर्यादित ,७२०यांचे प्रवर्तन सुधीर फडके उड्डाणपूल ,बोरिवली मार्गे २०.२० वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहे.
साईनाथ सबवे ,मालाड येथे पाणी साचल्यामुळे बंद केला आहे, सबब
२०. १५ वाजल्यापासून बस मार्ग क्रमांक ३४५ व ४६० हे गोरेगाव मदिना मंजिल उड्डाण पुलावरून परावर्तित केले आहेत. तर बस मार्ग क्रमांक २८१ चे प्रवर्तन साईनाथ रोड येथे खंडित करण्यात आले आहे.
आरे कॉलनी युनिट नंबर ६ आणि ७ च्या मध्ये झाड पडल्यामुळे बस मार्ग क्रमांक ४५२ च्या बस गाड्या २१.०० वाजल्यापासून आरे मार्केट, युनिट नंबर ६ येथे खंडित करण्यात आल्या आहेत.
रेल्वे वाहतूक सुरळीत -
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील चेंबूर आणि विक्रोळी स्थानकात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. चेंबूर येथे 80.04, विक्रोळी 79.76, सायन 61.98, घाटकोपर, 61.68, माटुंगा येथे 61.25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्व ट्रेन आणि एक्सप्रेस गाड्या वेळेवर सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment