मुंबई - मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईत काल २३ जूनला सकाळी पावसाच्या सरी पडल्या होत्या. त्यानंतर आजही पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असल्याने उन्हापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात होते. मात्र गेल्या काही वर्षात पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जूनच्या शेवटी पावसाला सुरुवात होते. यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाला उशीर झाला. पावसासाठी आणखी काही वेळ वाट पहावी लागणार अस हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यातच २३ जूनला मुंबई उपनगरात सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. आज २४ जूनला रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. यामुळे गेले काही महिने उन्हाला त्रासलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत २३ जून सकाळी ८ ते २४ जून सकाळी ८ या २४ तासात मुंबई शहरात १.५५, पूर्व उपनगरात ११.८९ तर पश्चिम उपनगरात १२.४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
No comments:
Post a Comment