Mumbai Local MegaBlock - मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2023

Mumbai Local MegaBlock - मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक


मुंबई - रविवारी (17 जून) रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावे असं आवाहन रेल्वे मार्फत करण्यात येत आहे. याची दखल घेऊन मुंबईकरांनी रेल्वेचा प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक - 
मध्ये रेल्वेच्या ठाणे - कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत  डाउन जलद सेवा ही ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच यादरम्यान या लोकल नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर देखील थांबतील. तर निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशिराने या लोकल धावतील. कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरुन सुटणाऱ्या लोकल या कल्याण ते ठाणे  स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर या लोकल थांबवण्यात येतील.  त्यानंतर मुलुंड येथून ही वाहतूक अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर या मार्गावरही दहा मिनिटे उशीराने लोकल धावतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - 
पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 वाजेपर्यंत या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र नेरुळ ते खारकोपर सेवेवर मेगाब्लॉगचा कोणताही परिणाम होणार नाही. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  तर  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 03.12 वाजेपर्यंत सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. पनवेल ते ठाणे या अप ट्रान्सहार्बर मार्गावर देखील सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर ठाणे ते पनवेल या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत ठाणे ते वाशीदरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad