मुंबई - मुंबईत गेल्या ४ महिन्यात खून, अपहरण, खुनाचा प्रयत्न, हुंडाबळी, लैंगिक शोषण, विनयभंग आणि महिलांवरील गैरवर्तन अशा घटनांचे गुन्हे मोठ्या प्रमाणात नोंदवण्यात आले आहेत. महिला अत्याचाराचे ९३ पोलीस ठाण्यांमध्ये १९७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये १४७० प्रकरणं सोडवली असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. (Mumbai unsafe for women)
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार बलात्कार, बेपत्ता, अपहरण आणि हुंड्यासाठी छळ यावर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होते. अहवालानुसार, जानेवारी ते एप्रिलपर्यंत मुंबई पोलिसांनी बलात्काराचे ३२५, अपहरणाचे ४०७ आणि हुंडाबळीचे २२८ गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी २८६ गुन्हे बलात्काराचे आणि ३३२ अपहरणाचे होते. हुंड्यासाठी छळाची फक्त ९५ प्रकरणे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्या वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या काळात महिलांवरील अत्याचाराच्या २०७८ गुन्ह्यांपैकी फक्त १३४१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एकूणच, मुंबई पोलीस दररोज १६ गुन्ह्यांची नोंद करत आहे. म्हणजे महिला अत्याचाराचे महिन्याला ४८० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
महिला गुन्ह्यांची सुनावणी लवकर होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी ६० दिवसांत गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश माजी डीजीपी संजय पांडे यांनी दिले होते. यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालणे, निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एकाकी महिला असतील तर त्यांना घरी नेण्याची व्यवस्था करणे, निर्भया पथक, निर्भया पेटी आदी सूचना केल्या होत्या.
No comments:
Post a Comment