मुंबईत ११ जूनपर्यंत जमावबंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2023

मुंबईत ११ जूनपर्यंत जमावबंदी


मुंबई - मुंबईमध्ये 28 मे ते 11 जून 2023 या कालावधी पर्यंत कडक निर्बंध लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी एक पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. लग्न समारंभ, शोकसमारंभ, कोऑपरेटिव्ह सोसायट्य–संस्थाचे कार्यक्रम, चित्रपटगृह, नाट्यगृह, दुकान, व्यवसायाची ठिकाणं यांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे.

पोलिसांच्या आदेश पत्रात म्हटल आहे की, मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसंच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा काही घटना घडवण्याची शक्यता गुप्त खबऱ्यांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीव सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती बेकायदेशीररित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध आणण्यात यावे असं जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे. 11 जूनपर्यंत शहरात हा आदेश लागू राहणार आहे. मुंबई शहरातील शांतता टिकून राहणे, मुंबईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू या हेतूने हा आदेश जारी करण्यात आल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्याची माहिती शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad