समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट व भौतिक प्रगती होणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2023

समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट व भौतिक प्रगती होणार - मुख्यमंत्री


नवी दिल्ली - 'समृद्धी महामार्गाच्या  दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण झाले आहे. हा महामार्ग प्रगती करणारा महामार्ग असून येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार'असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्ली येथे व्यक्त केला.

शिंदे यांचे महाराष्ट्र सदन येथे शुक्रवारी संध्याकाळी आगमन झाले. यावेळी त्यानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. समृद्धि महामार्गाबाबत बोलताना ते म्हणाले की, नागपुर ते शिर्डी ५२० कि. मी. लांबीचा समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२  रोजी झाला. या महामार्गाचा दुसऱ्या टप्याचा  शिर्डी ते नाशिककडे जाणारा इगतपुरी पर्यंत ८० किमी लांबीचा महामार्ग लोकांसाठी खुला केला आहे. या बद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग हा केवळ महामार्ग नसून त्या भागाची भरभराट, आर्थिक व भौतिक प्रगती करणारा महामार्ग आहे. यामुळे शेतकऱ्यांचा  मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून, आज शनिवारी नीती आयोगाची बैठक तसेच रविवारी नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad