छत्रपती संभाजीनगर - महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा घेतली. यावेळी सर्वांच्या नजर होत्या त्या उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
“अमित शाह म्हणाले होते की शिवसेनेला जमीन दाखवायची. मी म्हटले मला जमीन बघायचीच आहे. जमीन दाखवायची असेल, तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंचतरी जमीन जिंकून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानू. नाहीतर पुचाट लेकाचे, हिंदुत्वाच्या गप्पा करू नका.” अशी टीका त्यांनी गृहमंत्री अमित शहांवर टीका केली. तसेच, मी माझ्या वडिलांचे नाव सोडणार नाही. हिंमत असेल, तर तुम्ही पंतप्रधान मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन महाराष्ट्राच्या मैदानात येतो.” असे पुन्हा एकदा त्यांनी शिंदे गट आणि भाजपला दिले.
केंद्रात शेतकरी कायदा आणल्यावर उत्तरेतील शेतकरी रस्त्यावर आले होते. अद्यापही लोकशाहीतील दम गेलेला नाही. शिवसेना प्रमुखांनी जय जवान, जय किसान, जय कामगार हा नारा दिला होता. तुमच्या कष्टावर आणि घामावर देश उभा आहे. तुम्ही म्हणाल, तर आम्ही राज्यकर्ते आहोत. राज्यकर्त्यांनी देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम करायला हवं. पण, ती दिशा चुकून दुर्दशेकडे जात असेल, तर आम्हाला तुम्हाला घरी पाठवण्याचं काम करावं लागेल, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.
इथे अनेकदा आलो, गेल्या वर्षी आलो तेव्हा मुख्यमंत्री होतो, प्रत्येकवेळी गर्दीचा महापूर. आज अभिमानाने आणि समाधानाने आलो. १९८८ साली याच शहराने शिवसेनेच्या ताब्यात मनपा दिली. शिवसेनाप्रमुखांनी दंडवत घालून छ. संभाजीनगर हे नाव करणार असे वचन दिले. दोन वेळा केंद्रात आणि राज्यात आपण भाजप सोबत होतो पण छ. संभाजीनगर केले नाही ते काम मविआने करुन दाखवले. यावरून त्यांची वृत्ती दिसते. करत काहीच नाही कोंबड्या झुंजवायच्या जातीय तेढ निर्माण करायची.
नेतृत्वात निवडणुका लढवणार आहात का? आता बघा ही जनता कशी घाव घालते भाजप नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. देण्याची वृत्ती तुमचात नाही मोठी करणारी माणसं आजही माझ्या सोबतच. आपली दैवत आपल्याकडे बघताहेत. भाजप मधील सावरकर भक्तांना सांगतो सावरकरांनी जे कष्ट भोगले ते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी नाही.
सगळे विषय भरकटवून टाकायचे. केजरीवाल जे बोलतायत त्यावर उत्तर नाही आणि हे आम्हाला विचारतात. आम्हाला शिकवायला जाऊ नका. आमच हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही ते राष्ट्रीयत्व आहे. कश्मीरातील सैनिक औरंगजेब जो देशासाठी लढला तो औरंगजेब त्याला अतिरेक्यांनी मारला तो देशासाठी शहीद झाला तो आपला. अश्फाकुल्ला खान क्रांतिकारक आमचा. त्यांच्या बलिदानाचा संदर्भ. अनेकांनी देशासाठी सुख त्यागले. हे शक्तीप्रदर्शन. ही वज्रमूठ हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी. दोन्ही मूठी आवळून सभेतील लाखो उपस्थितांनी पाठिंबा दिला.
No comments:
Post a Comment