मुंबई - राज्यातील ८६१ पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळण्यासाठी मागील दिड महीन्यांपासून मुंबईच्या आजाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांचे १२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता आजाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन होत आहे. राज्यातील विविध संस्था संघटना व राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा दिला असून उद्या सर्व आजाद मैदानावर एकत्र येत आहेत.
समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली शिष्ठमंडळात विद्यार्थी नेते ईश्वर आडसुळ प्रदिप ञिभूवन संघमिञ गायकवाड प्रविण म्हस्के माधव वाघमारे संदिप खडसे विकास रोडे अतुल कांबळे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर या प्रकरणात तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही मी तुमच्यासोबत आहे अशी ग्वाही पवार यांनी दिली.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला, मात्र अवकाळी व गारपीटग्रस्तांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री अहमदनगर व धाराशीव दौ-यावर असल्याने त्यांच्याशी पवारांचा संपर्क होऊ शकला नाही. नंतर पवारांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली. ८६१ विद्यार्थ्याऐवजी २०० विद्यार्थ्यांची फेलोशिपची यादी जाहीर केल्याबद्दल पवारांनी यावेळी भांगे यांना सुनावले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा चार्ज आहे त्यांच्याकडे व्यवस्थित ब्रीफींग का केले जात नाही, असा सवाल पवार यांनी यावेळी बोलताना केला. मी मुख्यमंत्री राहून गेलो आहे मला सर्व माहीत आहे. असे खडे बोल सुनावत मुख्यमंत्र्यांकडे व्यवस्थित ब्रीफींग केली गेली पाहीजे असा सल्ला पवार यांनी यावेळी भांगे यांना दिल्याचे कळते.
दरम्यान या विषयासंदर्भात आपण स्वत: लक्ष घालून विद्यार्थ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घालून देतो असा शब्द पवार यांनी यावेळी दिला. दरम्यान पवारांच्या खरडपट्टीनंतर बार्टीने २०० विद्यार्थ्याच्या यादीला त्वरीत स्थगिती दिली आहे.
No comments:
Post a Comment