अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह निमित्त अग्निशमन दलाकडून प्रदर्शन - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

31 March 2023

demo-image

अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह निमित्त अग्निशमन दलाकडून प्रदर्शन

MFB%20logo

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संचालित मुंबई अग्निशमन दलाकडून १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ दरम्यान अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात अग्निशमन दलाकडून विविध स्पर्धा, प्रात्यक्षिकं, प्रदर्शन, पथसंचलन तसेच बक्षीस वितरण समारंभासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

मुंबई अग्निशमन दलाकडून सुरक्षा सप्ताह अंतर्गत भायखळा मुख्यालयात १४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता अग्निशमन दलातील शहिदांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर आणि सहकारी अधिकारी, जवान उपस्थित राहणार आहेत. १४ आणि १५ एप्रिल रोजी विक्रोळी येथील आर सीटी मॉल येथे अग्निशमन दलाकडून विविध प्रात्यक्षिकांची भित्तिपत्रके, तसेच अग्निशमन दलातील साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान ज्या अत्याधुनिक साहित्याचा, तंत्रज्ञानाचा वापर करतात, ती सर्व या प्रदर्शनात नागरिकांना पाहायला मिळणार आहेत. असेच प्रदर्शन १६ आणि १७ एप्रिल रोजी गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये तर त्यानंतर १८ आणि १९ एप्रिल रोजी लोअर परळ येथील फिनिक्स मॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून नागरिकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रदर्शनाला भेट देता येणार आहे.

अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी २० एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना सांताक्रूझ येथील मैदानावर अग्निशमन दलाचे जवान पथसंचलन करणार आहेत. अग्निशमन दलात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि जवानांना या कार्यक्रमात बक्षीस प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages