मुंबई - खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.
यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
दिनांक 16/04/2023 रोजी खारघर येथील कार्यक्रम सोहळा मध्ये मृत पावलेल्या पैकी 8 महिला व 3 पुरुष असे एकूण 11 शव उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे आले असून त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1) महेश नारायण गायकर वय 42
गाव --वडाळा मुंबई (मूळ गाव म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील वय 54
गाव ---म्हसळा रायगड
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे वय 51
गाव---गिरगाव मुंबई (मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी वय 30
गाव---शिरसाटबामन पाडा विरार
5) तुळशीराम भाऊ वांगड वय 58
गाव---जव्हार पालघर
6) कलावती सिद्धराम वायचळ वय 46वर्ष, राहणार सोलापूर
7) भीमा कृष्णा साळवी 58 वर्ष राहणार कळवा ठाणे
8) सविता संजय पवार 42 वर्ष राहणार मुंबई
9) पुष्पा मदन गायकर वय 64 वर्ष राहणार कळवा ठाण
10) वंदना जगन्नाथ पाटील वय 62 वर्ष राहणार करंजाडे व
11) एक अनोळखी महिला वय 50 ते 55 वर्ष
एकूण 11 मृतदेह पैकी दहा मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले असून एक मृतदेह बेवारस असून महिलेचा आहे वारसाचा शोध चालू आहे
No comments:
Post a Comment