नागपूर - महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणारा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरीत आहे. जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ च्या पंधरवड्यापर्यत या महामार्गावर एकूण ४२२ अपघातात ३७ जणांचा मृत्यू झाला. यात २२ पुरूष व २२ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी दिली. दरम्यान, हा महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावे लागला आहे. त्यामुळे अनेक जण हा महामार्ग टाळत आहेत.
अपघाताची शक्यता असल्याने समृद्धी महामार्गावर घासलेले टायर असलेली वाहने अडवण्यात येत आहे. या मार्गावर प्रवास करण्यासाठी नायट्रोजन गॅस भरलेले टायर उपयुक्त असल्याची माहिती यादव यांनी दिली. त्याकरीता महामार्गावरील सगळ्या पेट्रोलपंपांवर नायट्रोजन गॅस भरण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. येथे प्रवास करण्यासाठी चांगले टायर असणे आवश्यक आहे. रिमोल्डींग केलेले टायर वापरणे चुकीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
वाहनांनी भरला २० कोटी टोल -
समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गावरून केवळ महिनाभराच्या कालावधीत एकूण ३ लाख ५४ हजार २८३ वाहनांनी सुमारे २० कोटी २ लाख रुपयांचा टोल दिला आहे.
अपघाताची कारणे आणि उपाय
चालकाला डुलकी लागणे, अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, अतिरिक्त भार असलेले वाहन चालवणे, ताण, रस्ता संमोहन, लक्ष विचलित होणे आदी कारणांमुळे अपघात झाल्याचे या अधिका-याने सांगितले. अपघात होऊ नये म्हणून समृद्धी महामार्गावर बहुतांश ठिकाणी रोवर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तसेच वन्यप्राणी आडवे येऊ नये म्हणून क्रॅश बॅरीअरच्या बाजूने चेन लिंकींग फेन्सिंग उभारण्यात येत आहे. तसेच बुथवर पब्लिक अॅड्रेस सिस्टिम लावण्यात येत आहे.
इंटेलिजंट ट्रान्सस्पोर्ट सिस्टिम लवकरच
समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये म्हणून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. रहदारी आणि घटना नियंत्रणासाठी इंटेलिजंट ट्रान्सस्पोर्ट सिस्टिम (आयटीएस) लवकरच लावण्यात येणार आहे. या शिवाय महामार्गावर १३ इंधनस्थानके असून या व्यतिरिक्त १६ ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया प्रगती पथावर आहे.

No comments:
Post a Comment