छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2023

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा



छत्रपती संभाजीनगर - रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटाने जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेने रौद्ररूप धारण केले. पोलिसांच्या आणि खासगी मिळून १३ गाड्या जाळण्यात आल्या. काही पोलिस जखमी झाल्याचेही वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत १२ गोळ्या झाडल्या. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत.मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. पोलिस अधिका-यांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण १३ गाड्या जाळल्या गेल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.

अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या -
गुरुवारी साज-या होणा-या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या किराडपुरातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री बारा वाजेच्या सुमारास काही कारणावरून दोन गटांत वादाची पहिली ठिणगी पेटली. दोन्ही गटांत सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला. त्यानंतर हा वाद आणखी पुढे गेला. पुढे दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलिस रस्त्यावर होते. सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात काही पोलिसदेखील जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात काही समजकंटकांनी राडा घातला असल्याचे समोर आले आहे. मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे. तसेच पोलिसांकडून कायदा मोडणा-या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे देखील पोलिस आयुक्त म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad