मुंबई - गोरेगाव आरे परिसरातील गोकुळधाम परिसरात गेल्या काही दिवसात चोरी आणि घरफोडीचे प्रकार वाढले होते. याबाबत भाजपाच्या स्थानिक माजी नगरसेविका प्रिती मनोज सातम यांनी पोलिसांनी क्यूआर कोड लावून गस्त घालावी अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे या विभागात आता रोज पोलिसांकडून गस्त घातली जाणार असल्याने चोरी आणि घरफोडीचे प्रकार रोखणे शक्य होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 52 मधील गोरेगाव आरे आर एम एम एस सेक्टर गोकुळधाम परिसरात गेल्या 2 ते 3 महिन्यापासून घरपोडी दुकाने फोडी व दागिने लुटमारीच्या प्रकारासह मुलींशी अश्लील चाळे करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. त्याची गंभीर दखल घेऊन या संपूर्ण परिसरात मुंबई पोलीस गस्तीसह क्यूआर कोड बसवण्याची मागणी भाजपा माजी नगरसेविका प्रिती मनोज सातम यांनी 3 मार्च रोजी दिंडोशी पोलिसांकडे केली होती. दिंडोशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात याची तातडीने दखल घेतली. आर एम एम एस सेक्टर सह संपूर्ण गोकुळधाम परिसरात बसवलेले क्यूआर कोड तसेच परिसरात गस्त घातली जाईल असे आश्वासन प्रिती सातम यांना दिले. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 4 मार्च रोजी प्रिती सातम यांच्या उपस्थितीत पोलिस अधिकारी पी.एस.आय बनसोडे यांनी क्यू आर कोड बसविले. यावेळी विभागातील नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment