मुंबई - लालबाग पेरू कंपाऊंड मधील एका घरातील लोखंडी कपाटात प्लास्टिक पिशवीत भरुन ठेवलेला हा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातून उग्र वास यायला लागल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह आढळला आहे.
काल रात्री उशिरा एका घरातून उग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या घराची पाहणी केली. कपाट तपासलं असता, त्यामध्ये प्लास्टिकची एक मोठी पिशवी आढळली. या पिशवीमध्ये एका ५० -५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांना या महिलेच्या मुलीवर संशय आहे. तिनेच आपल्या आईचा खून करुन मृतदेह कपाटात ठेवल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे.
No comments:
Post a Comment