मुंबई - कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्हि.आर. श्रीनिवास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, या स्कायवॉकमुळे प्रवासाचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. मुंबईतील मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत. पुढील दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील सुशोभीकरणाचे कामे सुरू आहे. सर्वसामान्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीकृष्ण नगर नदीवरील पुलाचे लोकार्पण -
दहिसर येथील श्रीकृष्णनगर नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार प्रकाश सुर्वे, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी, सुनील शिंदे, राजहंस सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment